पुणे

पुणे : नवनियुक्त शिक्षक, उमदेवारांनी घरात बसून जाळल्या 'पदव्या'

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांनी शुक्रवारी घरात राहून पदवी जाळण्याचे आंदोलन केले. उमेदवारांनी घरात राहूनच आपल्या पदवी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति जाळत या आंदोलनात सहभाग नोंदविला.
सरकारच्या दुर्लक्ष  आणि अन्यायकारक धोरणाचा विरोध करण्यासाठी डी.टी.एड, बी.एड स्टूडंट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

'राज्यातील रखडलेली शिक्षक भरतीवरील निर्बंध हटवून पुन्हा ही प्रक्रिया सूरू करावी, मुंबई महानगरपालिकेमध्ये सहशिक्षक पदावर नियुक्त होऊनही नियुक्ती नाकारलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा, नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी, पवित्र पोर्टल मार्फत होत असलेल्या शिक्षकपद भरतीमध्ये 
मागासवर्गीयांची ५० टक्के पदकपात रद्द करावी, या मागण्यांसाठी असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात डी.एड, बी.एड.धारक आणि शिक्षण सेवक घरी बसून  सहभागी होणार असून पदवीच्या (डिग्री) प्रतिकात्मक प्रती जाळून ते व्हिडिओ, छायाचित्र सोशल मिडियाद्वारे शिक्षण मंत्री, आयुक्त यांच्यापर्यंत पोचविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करून आमच्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा, असे मत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्ष मत पूनम पाटील यांनी आवाहन पाटील यांनी मांडले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नवनियुक्त शिक्षक, सहशिक्षक आणि शिक्षक होण्याच्या प्रतिक्षेत असलेले उमेदवार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT