मोहननगर, चिंचवड - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
मोहननगर, चिंचवड - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. 
पुणे

वृत्तपत्र विक्रेत्यांची समाजाप्रती कृतज्ञता

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मंगळवारी (ता. १५) विविध सामाजिक उपक्रम राबविले. निमित्त होते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वृत्तपत्र विक्रेता दिनाचे आणि आयोजक होते पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ.

चिंचवड-मोहननगर येथील जिजामाता सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात डॉ. कलाम यांना अभिवादन करण्यात आले. रक्तदान शिबिरात ९२ जणांनी सहभाग घेतला. रक्तसंकलनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाची रक्तपेढी आणि मोरया रक्तपेढीचे सहकार्य लाभले. प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात १५० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्रदानाचा संकल्प करून त्यांनी संमतिपत्रे भरून दिली. नेत्रतपासणी शिबिरासाठी पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड आणि एशियन आय हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त संघटनेचे प्रसिद्धिप्रमुख हेमंत तांबे आणि मनोज काकडे यांनी विकसित केलेल्या संघटनेच्या www.punevvspc.com या संकेतस्थळाचे उद्‌घाटन अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते झाले. 

नगरसेविका मीनल यादव, संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे यांच्यासह सर्व विश्‍वस्त, विभागप्रमुख, पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT