corona  
पुणे

रांजणगावातील नागरिकांवर पुढील 14 दिवस हे आहेत निर्बंध 

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे २९ वर्षीय एका युवकाला कोरोनाची लागण झाली असून, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील ५ किलोमीटर परिसर १४ दिवस प्रतिबंधित व बफर झोन म्हणून घोषित केल्याची माहिती प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

रांजणगाव येथील एका युवकाला काल कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रांत अधिकारी देशमुख यांनी तातडीने गावाला भेट दिली. या वेळी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, महसूल, पोलिस आदी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाला रोखण्यासाठी रांजणगाव २५ जून ते ९ जुलैपर्यंत १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, लॉकडाउनचे काटेकोर नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामपंचायतीने प्रांत अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरु केले असून, दवंडीद्वारे नागरिकांना कोरोनाला रोखण्यासाठी आवाहन केले आहे. ९ जुलैपर्यंत रांजणगाव येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेऊन लॉकडाउनचे काटेकोर नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किराणा, दूध, शेतीविषयक दुकाने दररोज सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. भाजीपाला बाजार बुधवार व रविवारी सकाळी ९ ते १२ या ठराविक वेळेत चालू राहणार आहेत. 
नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 

दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या युवकाच्या संपर्कातील ३५ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी नेण्यात आले असून, त्यांच्या रिपोर्टकडे ग्रामस्थ व प्रशासनाचे डोळे लागले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT