rain.jpg 
पुणे

पुणेकरांनो काळजी घ्या; पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या 24 तासांत मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. 

मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार; तर पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. सध्या मॉन्सून कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटकचा अंतर्गत भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात सक्रिय आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार; तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात सर्वदूर पाऊस पडला आहे.

मराठवाड्यात अनेक दिवसांनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यात किनवट, निलंगा 60, आष्टी 50, अहमदपूर, अंबड, घनसावंगी, लातूर 40, औरंगाबाद, धर्माबाद, कन्नड, लोहा, माहूर, परभणी 30, अर्धापूर, औसा, गेवराई, हदगाव, हिमायतनगर, परतूर, वैजापूर 20 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला

पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस
 
पुणे : कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम पुणे शहरातही दिसला.पुढील पाच दिवस शहरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यात 19 आणि 20 सप्टेंबर दरम्यान मध्यम पावसाचे प्रमाण असेल तर जिल्ह्यात घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती अनुमप कश्यपी यांनी दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: एकाच महिन्यात महिलेचे तीनदा लग्न; बळजबरीमुळे कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पुण्यातून चालतंय लग्नाचं रॅकेट

Latest Marathi News Live Update : उद्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसेचा 20 वा वर्धापन दिन!

LPG Cylinder Booking Rules : सरकारने घरगुती LPG बुकिंगचे नियम बदलले, आता २१ दिवसांपूर्वी बुक होणार नाही दुसरा सिलिंडर, कारण काय ?

अमृता खानविलकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज! सुरु केला नवीन प्रवास, चाहत्यांना दिल 'खास' सप्राईज

Kolhapur College Crime: इंजिनियरींगच्या ५ विद्यार्थिनींना प्राध्यापकाने केबीनमध्ये बोलवलं अन् घडलं भयानक; कोल्हापूरमध्ये प्रकार

SCROLL FOR NEXT