In next Two days will increase temperature 16 degrees in pune 
पुणे

पुणेकरांना पुढील दोन दिवस मिळणार थंडीपासून सुट्टी !

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा १६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, सकाळी धुके पडेल.


पुण्यात फेब्रुवारीच्या सुरवातीला सरासरी किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस असते. यात १.८ अंश सेल्सिअसने वाढ झाली. त्यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमान सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअसने कमी झाले. संध्याकाळी साडेपाचपर्यंत कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस नोंदले.

पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


अरबी समुद्राच्या आग्नेय भाग आणि लक्षद्वीप परिसरात काही दिवसांपासून चक्रीय स्थिती तयार होण्यासाठी पोषक वातावरण आहे. तसेच, अरबी समुद्राच्या आग्नेय भाग आणि परिसर, लक्षद्वीप परिसर ते उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टीपर्यंत, अरबी समुद्राचा पूर्व भाग या दरम्यान चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. येत्या दोन ते तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात येत्या चार ते पाच दिवसात थंडी काही ठिकाणी कमी-जास्त होतील.


(Edited by : Sharayu Kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT