NGO should be involved with the administrative system as well said Governor 
पुणे

प्रशासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे : राज्यपाल

सकाळवृत्तसेवा

पुणे :  कोरोनाविरुध्दच्या लढाईत राज्यातील प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करीत असून, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या. राज्यपालांनी मुंबई येथील राजभवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना, मदतकार्य याचा आढावा घेतला. 


राज्यपाल कोश्यारी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन, पोलिस दल, आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्था हिरिरीने काम करीत आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर यांच्यापर्यंत मदतकार्य पोचवण्याबरोबरच बेघर, बेरोजगारांच्या समस्यांचाही जलद निपटारा करावा. या सर्व घटकांना अन्न, निवारा, औषधोपचार अशा सुविधा वेळेवर पोचवाव्यात. सफाई कर्मचाऱ्यांची या परिस्थितीत मोठी भूमिका आहे. डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

पुणे विभागातील आजअखेर स्थिती आणि उपाययोजना : 
- 2 हजार 450 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतले. यापैकी 149 जण पॉझिटिव्ह आणि 2 हजार 146 जण निगेटिव्ह आढळले. यापैकी 26 जण बरे होवून घरी गेले आहेत. तर, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

- पुणे विभागात एकूण 21 कोरोना चाचणी सुविधा केंद्रे आहेत.

- खासगी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट पुरवण्यासठी व्यवस्था केली असून, हाफकीन संस्थेमार्फत या कीटची तपासणी केली जात आहे. 

- स्थलांतरित कामगार व बेघर यांच्यासाठी कायमस्वरुपी 61 कॅम्प असून, त्याची क्षमता 4 हजार 360 व्यक्तींसाठी आहे. तर, खासगी कॅम्प 505 असून, त्यामध्ये 26 हजार 585 व्यक्तींची क्षमता आहे. साखर कारखान्यांच्यावतीने कामगारांना अन्न पुरविले जात आहे. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती व उपाययोजनांची राज्यपालांना माहिती दिली. ते म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भविष्यात बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजना केल्या जात आहेत. आयसोलेशन व आयसीयू व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येत आहे. डॉक्टर्स व स्टाफची पुरेशी संख्या असून, त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहे.

तसेच, लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कामगारांचे स्थलांतर न होण्याबाबत दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली असून 145  एनजीओमार्फत 1 लाख 15 हजार व्यक्तींना जेवण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना दूध, भाजीपाला, अन्नधान्य यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT