पुणे

न्हावऱ्याच्या तरटे-तांबे वस्तीत सातत्याने बिबट्याचे दर्शन

CD

न्हावरे, ता. १७ ः न्हावरे (ता. शिरूर) परिसरातील तरटे-तांबे वस्ती परिसरात नागरिकांना सातत्याने बिबट्या दिसत असल्याने येथील शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत आहे. तरी संबंधित विभागाने येथील बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अन्यथा या परिसरातील सर्व ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा शिरूर तालुका प्रहार क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय तरटे व माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख तांबे व ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात तरटे वस्तीवर पहाटे तीनच्या दरम्यान जनावरांवर बिबट्या हल्ला करण्याच्या तयारीत असताना जनावरांच्या आवाजाने येथील नाथा तरटे यांनी बॅटरीचा उजेड करून मोठ्याने आवाज करून बिबट्याला हुसकावून लावले होते. या घटनेने न्हावरे परिसरात दहशत पसरली आहे. त्यानंतर पुन्हा तरटे वस्तीवर पंढरीनाथ तरटे यांच्या कुत्र्याच्या पिलाचा बिबट्याने फडशा पाडला.
दरम्यान, मंगळवारी (ता. १३) येथील लष्करवाटेला भगवान तांबे यांच्या कांद्याच्या शेतात रात्री दहाच्या दरम्यान बिबट्या दबा धरून बसला होता. प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्यास हुसकावून लावले.
यापूर्वीही या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे, पाळीव कुत्री बिबट्याने ठार केली आहे. तरी तरटे, तांबे, जाधव, सरके, कोकरे वस्ती परिसरात वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT