Bhakti-Shakti-Chowk
Bhakti-Shakti-Chowk 
पुणे

निगडी उड्डाण पुलासाठी आठ महिने थांबा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात गेल्या दोन वर्षांपासून दुमजली बहुउद्देशील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या कामाची मुदत डिसेंबरमध्ये संपली. शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या या पुलाचे आतापर्यंत ८० टक्के काम झाले आहे. ठेकेदाराला मुदतवाढ दिली असून, ऑगस्टपर्यंत उड्डाण पूल पूर्ण होईल, अशी शक्‍यता महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दुमजली उड्डाण पूल उभारण्याचा आदेश २७ जून २०१७ रोजी महापालिकेने ठेकेदार बी. जी. शिर्के कंपनीला दिला. स्तुप कन्स्लटंट कंपनी सल्लागार आहे. 

विलंबाची कारणे
पुलाच्या कामासाठी पाणीपुरवठा व एमआयडीसीच्या जलवाहिन्या व विविध सेवावाहिन्या स्थलांतर करणे आवश्‍यक होते. त्यासाठी दोन्ही विभागांची परवानगी गरजेची होती. २०१९ च्या उन्हाळ्यात पाण्याची गरज असल्याने वाहिन्या स्थलांतरणास परवानगी मिळाली नव्हती. तसेच, निगडी पोलिस ठाणे ते त्रिवेणीनगर परिसरातून जाणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांचे टॉवरही स्थलांतरीत करायचे होते. हे काम विद्युत विभागाने निविदा काढून केले. याला कालावधी लागल्याने पुलाला विलंब झाला. 

रस्ते विकासची परवानगी
भक्ती-शक्ती चौक ते देहूरोड मार्गाकडील उड्डाण पुलाचा भाग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत येतो. तेथील उभारणीसाठी महामंडळाची परवानगी आवश्‍यक होती. ती मिळविण्यासाठी पुणे, मुंबईतील कार्यालयांसह दिल्लीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात पाठपुरावा करावा लागला. आता त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र 
मिळाले असल्याने कामाला गती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT