निगडी - ई-टॉयलेटच्या उद्‌घाटनप्रसंगी नितीन काळजे, शैलजा मोरे, लक्ष्मण जगताप, सीमा सावळे, अंजली भागवत, श्रावण हर्डीकर व इतर मान्यवर. 
पुणे

ई-टॉयलेटचे निगडीत उद्‌घाटन

सकाळवृत्तसेवा

निगडी - स्मार्ट आणि स्वच्छ शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पहिल्या ई टॉयलेटचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २५) निगडीत झाले. शहरात अजून चार ठिकाणी अशी ई टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.

महापालिका आणि सॅमटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ई टॉयलेटची गरज, किफायतशीरपणा यावर उपस्थित मान्यवरांनी मते मांडली. स्वच्छता अभियानात ई टॉयलेटची गरज असून, या अभियानाला यामुळे अधिक चालना मिळेल. अशा टॉयलेटच्या उभारणीसाठी अधिक पुढाकार घ्यावा; तसेच स्वच्छ शहरासाठी पालिकेने अशा टॉयलेटची संख्या वाढवावी. प्रसंगी अधिक आर्थिक भार पेलावा, अशीही सूचना वक्‍त्यांनी या वेळी केली.

आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्वच्छ भारत अभियानाच्या राजदूत नेमबाज अंजली भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका सुमनताई पवळे, कमल घोलप, आशा धायगुडे, शर्मिला बाबर, सुनीता तापकीर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्ष अश्‍विनी जाधव, चंदा लोखंडे, कैलास बारणे, सहायक आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते. आभार नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मानले.

ई टॉयलेटच्या उद्‌घाटनास पदाधिकारी, नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाच फौजफाटा अधिक होता. नागरिकांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत होती. मोठा डामडौल पण सामान्य नागरिक कार्यक्रमापासून दूर, हे या वेळी अधोरेखित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT