Nigerian citizen arrested for selling drugs Jail
पुणे

अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायझेरीयन नागरीकास अटक

सव्वा बारा लाख रुपये किंमतीचा 82 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायझेरीयन नागरीकास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा बारा लाख रुपये किंमतीचे 82 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला.

चुक्वीमेका केनेडी एनियाकोरा ( वय 44, रा. खडकी रेल्वे स्टेशनजवळ, खडकी, मुळ रा.लगोस नायझेरीया) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी मारुती पारधी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (क्रमांक 1) पोलिस अधिकारी व कर्मचारी चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी औंधमधील ब्रेमेन चौकाकडून स्पायसर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हस्तांतर केंद्राजवळ एक नायझेरीयन नागरीक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबला असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. त्यावेळी एनियाकोरा हा तेथे संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 12 लाख 38 हजार रुपये किंमतीचे व 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल आढळून आला. एनायकोरा हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे त्याच्या चौकशीतुन पुढे आले. हि कारवाई पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलिस कर्मचारी मारुती पारधी, मनोज साळुंके, संदिप जाधव, राहुल जोशी, पांडुरंग पवार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार या सिंहाचा आणि अजित पवार या वाघांचा वारसा सांगणारा-आमदार अमोल मिटकरी

Sunset Destinations: 'Sunset Lovers' साठी भारतातील हे 4 हॉटस्पॉट्स, एकदा नक्की भेट द्या!

SCROLL FOR NEXT