nikhil dhotre sakal
पुणे

...आई मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन, माझ्या बाळाला चांगल सांभाळ !

सासुरवाडीच्या छळास कंटाळून आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ह्दय पिळवटून टाकणारी चिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "आई तु काळजी करू नको, मी पुन्हा तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईल. माझ्या बाळाला सांभाळं. त्याची काळजी घे.'' अशा शब्दात आपल्या आईला भावनिक साद घालत एका तरुणाने सासुरवाडीच्या लोकांकडून होणाऱ्या छळास कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील ह्दयस्पर्शी मजकुराने अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू ओघळले ! तेवढ्यावरच न थांबता त्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांच्या नावांचा चिठ्ठीत उल्लेख करून त्यांना सासुरवाडीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची विनंतीही केली.

गोखलेनगर येथील निखिल धोत्रे (वय 30) या तरुणाने रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिलचे एक वर्षापुर्वी लग्न झाले होते. त्यानंतर त्याने रविवारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये त्याने सासुरवाडीच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्याने आई व मुलाबद्दलही भावनिक

निखिलचे त्याचे कुटुंब व मुलावर असणारा अतोनात जीव आणि त्यांच्यापोटी वाटणारी काळजी चिठ्ठीतुन व्यक्त केली आहे. "आई तु काळजी करू नकोस माझी. मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन. आई मी समझून माझ्या बाळाचा सांभाळ कर.त्याची काळजी घे. आई विकास (आग्या) कडे लक्ष दे, त्याची खुप काळजी घे.'' असे जन्मदात्या आईकडे आपल्या लेकराच्या सांभाळा करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे.

"मी खुप डिप्रेशनमध्ये आहे. सासुरवाडीच्या लोकांनी मला, माझ्या कुटुंबाला खुप त्रास दिला. वर्षभरापासून सासुरवाडीच्या लोकांनी माझ्याकडून एक लाख 30 हजार रुपये घेतले, मी कर्जबाजारी झालो. माझ्या मृत्युला याच व्यक्ती जबाबदार आहेत. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी माझी सरकारला विनंती आहे.'' अशा भावनिक शब्दांत निखिलने थेट मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनाच आर्जव केला आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्तांनी मला त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT