Anuradha Bhosale Sakal
पुणे

वीटभट्टी कामगारांच्या मुलामुलींच्या विकासाची तळमळ

सतत स्थलांतरामुळे वीटभट्टी कामगारांच्या बालकांचं शालेय शिक्षण मध्येच खुंटतं. त्यापैकी कित्येकांना, विशेषतः मुलींना बालकामगार म्हणून राबावं लागतं.

नीला शर्मा

सतत स्थलांतरामुळे वीटभट्टी कामगारांच्या बालकांचं शालेय शिक्षण मध्येच खुंटतं. त्यापैकी कित्येकांना, विशेषतः मुलींना बालकामगार म्हणून राबावं लागतं. त्यांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देत, जीवनकौशल्यं व सामाजिक भान देण्यासाठी ‘अवनि’ ही संस्था कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात काम करते. अवनि हे नाव अन्न, वस्त्र व निवारा या तीन शब्दांच्या अद्याक्षरांपासून तयार केलं आहे, असं संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी सांगितलं.

वीटभट्टी कामगारांच्या मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचा पाया महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रयत्नशील असलेली ही संस्था विविध प्रकारच्या समाजविकासात्मक कामं करते. अनुराधा म्हणाल्या, ‘‘मुलींच्या शिक्षणासाठी तर आम्ही कार्यरत आहोतच, पण किशोरवयीन मुलांना लिंगभाव समानता शिकवण्याची जबाबदारीही आम्ही पार पाडत आहोत. मुलगे घरात व सभोवती मुलींना, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाताना पाहतात. तेच त्यांच्या मनावर ठसतं आणि पुढे तेही तसंच वागतात. यातील काही अल्पवयीन मुलं पुढे बलात्काराच्या घटनांमध्ये दोषी आढळतात. योग्य काय, अयोग्य काय; तेच माहीत नसल्याने मुलं मुलींबाबत आक्रमक वागू शकतात. यात सुधारणा व्हावी, म्हणून आम्ही मुलांच्या मनात समानतेची भावना पेरतो. यासाठी सोळा आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे. त्याच्या सुरवातीला प्रश्नावलीत मुलांनी असंवेदनशीलपणे दिलेली उत्तरं व अभ्यासक्रम संपताना नमूद केलेल्या उत्तरांमध्ये मोठा फरक पडतो. त्यांच्यात समंजसपणा आलेला जाणवतो. यातलं एक बोलकं उदाहरण नुकतंच घडलं. हा अभ्यासक्रम केलेल्या एका मुलाच्या लक्षात आलं की, आपल्या बहिणीला शाळेतून काढून धुणीभांडी करायला आईवडील पाठवतात. आपल्याला मात्र शाळेत जायला प्रोत्साहन देतात. हा मुलगा बहिणीला शाळेत पाठवलं नाही तर मीही शिकणार नाही, असं म्हणून हट्टाला पेटला. शेवटी बहिणीला तिचा शिक्षणाचा हक्क मिळाला. आम्ही झोपडपट्टी वस्त्यांमध्ये हे वर्ग घेतो; पण चाळीसहून अधिक शाळांमध्ये हा अभ्यासक्रम चालवतो. पंचवीस मुलांच्या तुकड्या केल्याने प्रत्येकाशी नीट संवाद साधता येतो.’’

अनुराधा यांनी असंही सांगितलं, की १९९५ मध्ये अरुण चव्हाण यांनी ही संस्था स्थापन केली. एका वर्षानंतर मी उपाध्यक्षपदावर संस्थेत रुजू झाले. गेल्या वर्षी चव्हाणांच्या निधनानंतर माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. अनेक बालकांना बालकामगारातून मुक्त केल्यावर आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. स्थलांतरामुळे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी काही मुलींच्या निवासासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. किशोरवयीन मुलींना मासिकपाळीसंबंधी घ्यायची काळजी, आरोग्य व स्वच्छतेचे पाठ देण्यावरही संस्थेचा भर आहे. संस्थेत राहून शिकलेल्या मुलींच्या जीवनाला शिक्षणामुळे नवी दिशा मिळाली आहे. बालमजुरी, बालविवाह, दुय्यम वागणूक आदींच्या दुष्टचक्रातून त्या बाहेर पडल्या आहेत. त्यांच्या पालकांच्या मूळ गावचा पत्ता, दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी क्रमांक वगैरे तपशील आमच्याकडे असतो. आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. परिवर्तनात सामील झालेल्या पालकांची संघटना स्थापन केली असून, त्यांच्यासाठी कल्याणकारी शिबिरं आयोजित करत असतो.

मी स्वतः बालपणी घरच्या गरिबीमुळे धुणीभांडी करत शिकले. भरपूर अभ्यास करून प्रगतीच्या वाटा शोधत येथवर आले. मदत करणाऱ्यांनी शिक्षणाचे मार्ग दाखवले. मुंबईतील ‘निर्मला निकेतन’मधून सामाजिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. माझ्या त्या संघर्षामुळे या मुलींबद्दल मला कमालीची आस्था वाटते. त्यांना समाजभान देण्यात विशेष आनंद होतो.

- अनुराधा भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT