Sharad Pawar_Nilesh Lanke 
पुणे

Nilesh Lanke: "साहेब सांगतील तो आदेश"; पवारांसोबत झालेल्या पत्रकार परिषदेत लंके स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज शरद पवार यांची पुण्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज शरद पवार यांची पुण्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या ठिकाणी शरद पवारांसह त्यांची पत्रकार परिषदही पार पडली. यानंतर त्यांनी कोविड काळात केलेल्या कामावर आधारित एका पुस्तकाचं प्रकाशन पवारांच्या हस्ते पार पडलं.

यावेळी अजित पवारांसोबत असलेले लंके शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरु होती. पण लंकेंचा पक्ष प्रवेश झाला नाही. पण त्यांनी काही सूचकपणे संकेत दिले आहेत. (nilesh lanke says sharad pawar will say that is order for me he clearly indicates in press coference)

शरद पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जेव्हा लंके यांनी जाहीर केलं त्यावेळी अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना लंकेंना लोकसभेचं आश्वासन दिलं असेल अशी टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीवर भाष्य करताना लंके म्हणाले, "खासदारकीची आणि कुठल्याही निवडणुकीची शरद पवारांसोबत माझी चर्चा झालेली नाही. अजूनही मी पवारांच्या विचारधारेसोबत आहे. बहुजन समाजासह सर्वसामान्यांना घेऊन जाणारा जो नेता आहे त्या नेत्याची विचारधारेसोबत आहोत. (Latest Marathi News)

काल आज आणि उद्याही शरद पवारांची विचारधारेसोबत मी असणार आहे. नेते समोर बसलेले असताना कार्यकर्त्यानं सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्यामुळं मी इथं काहीही बोलू शकत नाही. साहेब सांगतील तो आदेश आहे. साहेबांच्या मंचावरुन दुसऱ्या मंचावर जाणं सोप आहे का? अशा सूचकपणे लंके यांनी आपण शरद पवारांसोबतच आहोत हे सांगितलं आहे. (Latest Maharashtra News)

संभाजी महानाट्य जेव्हा मतदारसंघात आयोजित केलं होतं तेव्हा अमोल कोल्हेंशी लोकसभा निवडणुकीबाबत बोलणी झाली होती का? या पत्रकारांच्या प्रश्नावर लंके म्हणाले, "अनेक दिवसांपासून आमचं चाललं होतं की, अमोल कोल्हेंचं महानाट्य आयोजित करायचं. पण त्यांच्या तारखा जुळून येत नव्हत्या, अमोल कोल्हे आणि माझे भावासारखे संबंध आहेत. त्यामुळं त्यांच्याशी चर्चेनंतर ते माझ्या मतदारसंघात महानाट्यासाठी तयार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT