arrested.jpg
arrested.jpg 
पुणे

नीलेश वाडकर खून प्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे : जनता वसाहतीमधील नीलेश वाडकर याच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आणखी एका मोठ्या शिताफिने आरोपीस अटक केली. त्यामुळे या गुन्हात अटक केलेल्या आरोपीची संख्या 14 पर्यंत पोचली आहे. 

सुरज बबन कोळगे (रा. जनता वसाहत) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात जनता वसाहतीमध्ये दोन गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्ववादातुन सराईत गुन्हेगार नीलेश वाडकर याचा खून करण्यात आला होता. या खुनाच्या प्रकारानंतर जनता वसाहतीमधील गुन्हेगारीने डोके वर काढण्सास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांना अटक केली होती. 

या खुनामध्ये सहभाग असलेला  कोळगे अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यादृष्टिने दत्तवाडी पोलिसांचे तपास पथक त्याच्या मागावर होते. पोलिस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांना कोलगे तळजाई मंदिर परीसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा करुन सापला रचला. कोलगे यानेही पोलिसांना ओळख पटु नये यासाठी दाढ़ी वाढवून शुक्रवारी दुपारी तळजाई मंदिर परसरातील एका टपरीवर थांबला होता. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

सुरज कोळगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. याबरोबरच तो निलेश वाडकर टोळीचा कट्टर विरोधक होता. पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली संकपाळ, पोलिस कर्मचारी सुधीर घोटकुले, सोमेश्वर यादव, अमित सुर्वे,शिवाजी क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT