तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी
निंबर्गीतील तरुणावर गुन्हा
कुसूर, ता. २४ : निंबर्गी येथे १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावातील एका तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, संबंधित तरुणाविरुद्ध मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद पंचप्पा स्वामी (वय २१, रा. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. मृत अक्षता बाळासाहेब काटकर (वय १९, रा. सलगर बुद्रूक, ता. मंगळवेढा) हिच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित आरोपी वारंवार संपर्क साधण्याचा व बोलण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करत होता. मोबाईलवरून सतत फोन करून त्रास देत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या मानसिक त्रासाला कंटाळून अक्षता हिने घरात कोणी नसताना साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी संशयिताचे कॉल डिटेल तपासले असता त्याने वारंवार फोन केल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिच्या मैत्रिणींचे जबाब नोंदवून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानुसार अक्षता हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली विवेकानंद स्वामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षता ही निंबर्गी येथे आजोबा तुकाराम डोंगरे, आजी सुशाबाई डोंगरे व मावशी मीनाक्षी इंगळे यांच्याकडे राहात होती. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले होते. ती निंबर्गी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाली होती. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या तिच्या आत्महत्येची नोंद मंद्रूप पोलिस ठाण्यात झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.