पुणे

निंबूत येथे गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

CD

वडगाव निंबाळकर, ता. २६ : निंबूत (ता. बारामती) गावच्या हद्दीत ओढ्यालगत सुरू असलेला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा वडगाव निंबाळकर पोलिसांनी उद्ध्वस्त करत सुमारे ३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
प्रमोद प्रकाश नवले (रा. लक्ष्मीनगर, निंबूत, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. नवले हा गावठी दारू निर्मिती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाड टाकली. पाहणीदरम्यान तीन लोखंडी बॅरलमध्ये कच्चे रसायन, जमिनीत खड्डा करून साठवलेले रसायन, दोन प्लास्टिक टाक्या, २४ नग ३५ लिटर क्षमतेची हातभट्टी दारू, चार विद्युत मोटर पंप व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, महिला पोलिस हवालदार शुभांगी दणाने, पोलिस अंमलदार आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे, महिला पोलिस अंमलदार प्रियांका झणझणे तसेच चालक पोलिस हवालदार विजय शेंडकर यांनी संयुक्तरित्या केली.

3010

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदारासह निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्सचा छापा, १० कोटींची रोकड जप्त; वऱ्हाडी बनून पोहोचले अधिकारी

ACB चा मोठा दणका! पोलिस उपनिरीक्षकासह मुख्याध्यापकाचा 'काळा' कारनामा कॅमेऱ्यात कैद; एकाने मागितले 50 तर दुसऱ्याने मगितली 25 हजारांची लाच!

Vintage Tractor Video : जुनं ते सोनं ! १०५ वर्ष भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरने मालकाला बनवले कोट्यधीश; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

Kidney Racket: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावण्याची मागणी; आरोपींची संपत्ती गोठविणार, गृहराज्यमंत्री भोयर

SCROLL FOR NEXT