पुणे

निमगाव म्हाळुंगीत दिवसा घरफोडी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ६ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील रणदिवे वस्तीवर चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यात साडेनऊ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ४६ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. रणदिवे वस्तीवरील अमोल सोपान काळकुटे (वय ४०) यांच्या घराचा दरवाजा बुधवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास चोरट्यांनी उचकटला. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील ९ लाख ५२ हजार ७३४ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ४६ हजार रुपये रोख चोरून नेले. काळकुटे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी काळकुटे यांनी केली आहे. शिक्रापूर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT