पुणे

निमगावात १२ एकरवरील केळीचा प्रयोग यशस्वी

CD

दावडी, ता. १८ : श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून सहा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सुमारे १२ एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. टिश्यू कल्चर पद्धतीने केलेल्या या लागवडीला अवघ्या सात महिन्यांत घड येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
राहुल मावळे व हर्षवर्धन शिंदे यांनी प्रत्येकी दोन एकर, मल्हारी शिंदे व योगेश मावळे यांनी प्रत्येकी दीड एकर तर गणेश राऊत व नारायण राऊत यांनी प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. मायक्रोसन जी-९ (टिश्यू कल्चर) जातीच्या रोपांची २० ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान लागवड करण्यात आली. ठिबक सिंचन, मल्चिंग व पीक व्यवस्थापनामुळे बागांची वाढ चांगली झाली आहे.

केळी बागांमधून एकरी ३० ते ४० टन उत्पादन अपेक्षित आहे. सध्या निर्यातक्षम केळीला २० ते २५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याने चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामोन्नती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे, निमगावचे कृषी सहाय्यक नवीनकुमार गुंडाळ, कृषी तज्ज्ञ महेंद्र भोर, अनिल सगळगिळे, शंकर गुरव तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीक व्यवस्थापन करण्यात येत आहे.

अनुदानामुळे लागवडीचा निर्णय
पूर्वी फ्लॉवर, मका व ऊस यांसारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीतील संधी, उत्पादनाची क्षमता आणि फळबाग लागवडीसाठी उपलब्ध शासकीय अनुदानाचा विचार करून केळी लागवडीचा निर्णय घेतला. भीमा नदी व चासकमान डावा कालव्यामुळे परिसरात वर्षभर पाण्याची उपलब्धता असून, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन केळी पिकासाठी पोषक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बागांच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांची भेट
निमगाव परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या क्षेत्रावर केळीची लागवड झाल्याने बागांची पाहणी करण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण देखभालीच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला फायदेशीर पर्याय निर्माण करता येतो, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

निमगाव खंडोबा (ता. खेड) : केळीचा घड दाखवताना डावीकडून पहिले पंकज मावळे, दुसरे राहुल मावळे, (उजवीकडून तिसरे) मल्हारी शिंदे तसेच दुसरे हर्षवर्धन शिंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT