पुणे

Vidhan Sabha 2019 :  झेडपीचे ९ आजी-माजी सदस्य आखाड्यात

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
पुणे -  पुणे जिल्हा परिषदेचे नऊ आजी - माजी सदस्य यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. यामध्ये भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, प्रत्येकी एका माजी अध्यक्ष, उपाध्यक्षासह सहा माजी सदस्यही आमदारकीसाठी आपापले नशीब अजमावत आहेत.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान ७५ सदस्यांपैकी अवघ्या एका सदस्याला राष्ट्रीयीकृत राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली असून, अन्य दोघे जण अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये पंचायतराज संस्थांमधील (ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद) आजी-माजी सदस्यांची चलती असते. यानुसार आतापर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत किमान पाच ते सहा सदस्यांना कोणत्या राजकीय पक्षांची अधिकृत उमेदवारी हमखास मिळत असते. 

यंदा मात्र पुणे जिल्ह्यातील केवळ एका जिल्हा परिषद सदस्याला तीही जिल्ह्याबाहेरील मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. बारामती तालुक्‍यातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगर जिल्ह्यातील जामखेड-कर्जत मतदारसंघातून उमेदवारी दिली  आहे. रोहित पवार यांची लढत कॅबिनेटमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी होत आहे.

शिवसेनेच्या उमेदवारीवर जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या, परंतु आता सेनेत नसलेल्या आशा बुचके या जुन्नर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्या सध्या सेनेत नसल्या तरी जुन्नर तालुक्‍यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे येथील सेना उमेदवाराची मोठी पंचायत होणार आहे.

भाजपचे जि.प. सदस्य अतुल देशमुख हे खेडमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत ही विद्यमान आमदार आणि सेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्याशी होणार आहे. गोरे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. इंदापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे  आणि भाजपने माजी आमदार  हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

भरणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, तर पाटील हे माजी सदस्य आहेत. भोरमधून माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे हे सेनेचे उमेदवार म्हणून, शिरूरमधून भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे, तर खडकवासला मतदारसंघातून रमेश कोंडे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे तीनही जण माजी सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT