सकाळ इम्पॅक्ट लोगो
MGV२६B१५४२३
मंगळवेढा ः तालुक्यातील निंगिरा ओढ्यात सोडण्यात आलेले उजनी कालचे पाणी.
अखेर निंगिरा ओढ्यात उजनी कालव्यातून सोडले पाणी
दैनिक सकाळच्या बातमीची दखल; शेती अन् जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २२ ः उजनी लाभक्षेत्राअंतर्गत असलेल्या निंगिरा ओढ्यावरील सिमेंट बंधारे कोरडे पडल्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. उजनीतून धरणातून सोडलेल्या पाण्याने हे बंधारे भरून द्यावेत, अशी मागणीचे वृत्त दैनिक सकाळने प्रसिद्ध करताच ओढ्यात पाणी सोडल्याने या भागातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
उजनी कालव्यामुळे तालुक्यातील बागायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बागायती पिकांसाठी बँका, पतसंस्थेचे आर्थिक साहाय्य घेऊन शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन पिके घेण्यास सुरुवात केली. मात्र उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पाळी लांबणीवर पडल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे त्याचे पडसाद बँक कर्जावर उमटत आहे. भीमा नदीपात्रात पाणी न सोडल्याचा मुद्दा जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचारात आला होता. दरम्यान उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर सध्या उजनी कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले. निंगिरा ओढ्यावर पाचपेक्षा अधिक सिमेंट बंधारे आहेत. त्यामुळे या परिसरातदेखील बागायत क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. हे बंधारे भरून दिल्यास उन्हाळ्यात या भागातील शेती पिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु त्या दृष्टीने उजनी विभागाने लक्ष घातले नसल्यामुळे या भागातील सर्व बंधारे कोरडे पडले होते. दरम्यान याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच दैनिक सकाळने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे.
--------
कोट...
निंगिरा ओढ्याच्या लाभक्षेत्रातील बंधारे कोरडे पडल्याचा पिकावर परिणाम होत असल्याने खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली. दैनिक सकाळने या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे जलसंपदा विभागाने ओढ्याच्या पात्रात पाणी सोडले आहे.
- डॉ. नंदकिशोर शिंदे, शेतकरी, डोंगरगाव, ता. मंगळवेढा
सध्या पिकासाठी व जनावरे जतन करण्यासाठी ओढ्याच्या पात्रात पाणी सोडले आहे. भविष्यात कायमस्वरूपी पाणी सोडण्याबाबत शेतकरी व वरिष्ठ अधिकारी यांच्यात समन्वय साधून योग्य तोडगा काढला जाईल.
- तेजस चव्हाण, कनिष्ठ अभियंता, उजनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.