Nira-Deoghar project sakal
पुणे

Nira Devdhar Irrigation : नीरा-देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख निधी

नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली.

विजय जाधव

भोर (पुणे) - तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.७) सोशल मिडीयावर याबाबत माहिती प्रसिध्द केली.

या नवीन प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या चार तालुक्यातील नागरिकांना आणि शेतीला याचा लाभ मिळणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले.

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून ६ डिसेंबरला याबाबतच्या मंजूरीचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीत गुंतवणूक मंजुरी समितीच्या शिफारशीनुसार या प्रकल्पास मंजूरी देण्यात आलेली आहे.

सिंचन, पूरनियंत्रण आणि बहुउद्देशीय प्रकल्पांवरील सल्लागार समितीच्या अटींच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात आली असल्याचेही जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन पकडलं, अमित शहांची माहिती

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT