पुणे

सामूहिक राष्ट्रगीताने नीरेत चैतन्य

CD

वाल्हे, ता. १६ : घड्याळाचा काटा अकरावर येताच संपूर्ण नीरा (ता. पुरंदर) शहरात एकाच वेळी ‘जन गण मन...’चा स्वर घुमला आणि दैनंदिन धावपळ काही क्षणांसाठी थांबली. दुकाने, बाजारपेठ, रस्ते, कार्यालये आणि विविध आस्थापनांमध्ये असलेले नागरिक ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी उभे राहिले. राष्ट्रगीताच्या एकाच वेळी सुरू झालेल्या स्वरांनी संपूर्ण नीरा शहर भारावून गेले.
या उपक्रमाचे आयोजन मंगेश ढमाळ मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी महात्मा गांधी विद्यालय, सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजवंदन झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता पूर्वनियोजित वेळेत संपूर्ण शहरात एकाच वेळी राष्ट्रगीत गायनास सुरुवात झाली.‘देशासाठी केवळ तीन मिनिटे’ या भावनेतून नागरिकांनी आपापली कामे थांबवून राष्ट्रगीताला मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या हातात तिरंगे झेंडे होते, तर काहींनी राष्ट्रगीताच्या वेळी तिरंग्याला सलाम करून अभिवादन केले. विविधतेत एकतेचा संदेश देणारा हा क्षण निरेकरांच्या देशप्रेमाची आणि सामाजिक एकजुटीची साक्ष देणारा ठरला. या सामूहिक राष्ट्रगीताला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी एकत्र येत ‘एक देश, एक भावना’ या एकतेचा संदेश दिला. देशासाठी आपली तीन मिनिटे देत निरेकरांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशभक्तीच्या अनोख्या उपक्रमाने संस्मरणीय केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, विद्यार्थ्यांचा ठिय्या, अभिजित दिपके विद्यार्थ्यांच्या भेटीला

Jammu Martyr Honours: जम्मू येथे शहीद जवान वैभव अवताडे यांना अखेरचा निरोप; गणेशवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

IND vs SL, 1st Test : द्रविड-पुजाराच्या क्लबमध्ये पडिक्कलची एन्ट्री; पण द्विशतकाकडे वाटचाल करताना झाला घात

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सुटली गोळी, वाराणसी विमानतळावर तिघे जखमी

Earthquake reasons: महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 29 भूकंप! काय आहेत कारणं? मुंबईला धोका आहे का? तज्ज्ञ काय सांगताएत?

SCROLL FOR NEXT