पुणे

निर्भय कन्या अभियानात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

CD

वडगाव मावळ, ता.१ : येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने निर्भय कन्या अभियान साजरे करण्यात आले.
या निमित्त विद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात डॉ. शीतल दुर्गाडे यांनी ‘स्वयंरोजगार व कौशल्य उद्योजकता’ विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. योगेश जाधव यांनी ‘स्वसंरक्षण’ षयावर प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांनी आपली काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये ॲड. पूजा बुटाला यांनी ‘स्त्रियांवरील अत्याचार व कायदेविषयक माहिती’ विविध उदाहरणाद्वारे देऊन भारतीय न्याय संहिता मधील कलम ६३ ते ९९ याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीप गाडेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. शीतल देवळालकर, ज्योती रणदिवे, सोनाली पाटील, शबाना मोकाशी, डॉ. दीपा नेवसे, संध्या घोडके, मोहन कडू, हर्षदा गायकवाड, संतोष ढमाले, विनायक येळवंडे आदी उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.उर्मिला करपे हिने आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, प्राचार्य डॉ. निता धायगुडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Central Railway: मध्य रेल्वेची मोठी कारवाई! तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या १६ लाख प्रवाशांना दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Onion Price Cras : आखातातील युद्ध ठरणार शेतकऱ्यांसाठी काळ? निर्यातीला ब्रेक लागल्याने कांद्याचे दर मातीमोल

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

SCROLL FOR NEXT