फोटो ः नितीन बोरकर
नितीन बोरकरचा सुरेख खेळ
पुणे, ता. १० ः डीएसपी स्पोर्ट्स ॲण्ड इव्हेंट्स आयोजित डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत नितीन बोरकरच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर बीकेसी इलेव्हनने मायटी स्टार्स संघावर तेरा धावांनी विजय मिळविला.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बीकेसी इलेव्हनने १३२ धावा केल्या, त्यात महत्त्वाचा वाटा नितीन बोरकरने पाच चौकार व दोन षटकारांसह केलेल्या ४७ धावांचा होता. चंद्रकांत सरोज व देबोजीतने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना मायटी स्टार्स संघाचा डाव ११९ धावांत आटोपला. या वेळी चंद्रकांत सरोज व वैभव जठारने केलेली खेळी अपुरी पडली. प्रशांत भोयरने तीन, तर दिव्यांशु त्रिपाठीने दोन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान नितीन बोरकरने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
बीकेसी इलेव्हन - (२० षटकांत) सर्वबाद १३२ (नितीन बोरकर ४७, सुमीत रस्तोगी १८, देबोजीत २-१६, चंद्रकांत सरोज २-१७) विजयी विरुद्ध मायटी स्टार्स - (१८.३ षटकांत) सर्वबाद ११९ (चंद्रकांत सरोज २३, वैभव जठार २३, प्रशांत भोयर ३-१३, दिव्यांशु त्रिपाठी २-३५, नितीन बोरकर १-१६).
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.