Nitin Gadkari esakal
पुणे

Nitin Gadkari :... अन्यथा 'हे' दोन रस्ते ताब्यात घेऊ; नितीन गडकरींनी राज्य सरकारला दिला तीन महिन्यांचा वेळ

Nitin Gadkari On Pune Mumbai Highway : यासोबतच गडकरींनी सांगितले की, ‘मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्ग पुण्यातील रिंगरोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील अटल सेतूवरून निघाल्यास दोन तासांत पुण्याला पोहोचणे शक्य होईल असेही गडकरी म्हणाले.

रोहित कणसे

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी या महामार्गांवरील खड्डे तीन महिन्यात न बुजविल्यास रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात घेऊ असे गडकरी म्हणाले आहेत. तसेच या रस्त्यांच्या दुरूस्तीबद्दल राज्य सरकारला नोटीस पाठवणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले आहे.

पुणे येथे श्री संत ज्ञानेश्‍वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर मार्गाचे चौपदरीकरण, वारजे-सिंहगडदरम्यान सेवारस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याला जोडणाऱ्या चारही मार्गांचा विकास केला जाणार आहे. तसेच ‘रिंगरोड’च्या माध्यमातून चारही बाजूंच्या रस्त्यांना जोडले जाईल. पुण्यातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी पुण्यात इथेनॉलवर वाहने धावली पाहिजे. यासाठी पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू झाले पाहिजे. याकरिता राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

गडकरी नेमकं काय म्हणाले?

या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी सांगितले की, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग बांधताना काही चुका झाल्या आहेत. हा द्रुतगती मार्ग कात्रज घाटापर्यंत जोडण्याचा विचार होता; मात्र अधिकाऱ्यांनी होऊ दिला नाही असेही त्यांनी सांगितले. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खड्ड्यांची दुरुस्ती होत नाही, महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’ची आहे. ‘एमएसआरडीसी’ने तीन महिन्यांत खड्डे न बुजविल्यास रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात घेऊ असेही गडकरी यावेळी म्हणाले.

यासोबतच गडकरींनी सांगितले की, ‘मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्ग पुण्यातील रिंगरोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील अटल सेतूवरून निघाल्यास दोन तासांत पुण्याला पोहोचणे शक्य होईल. पुण्याहून-बंगळूरला अवघ्या चार तासांत पोहोचता येईल. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर ते यवतदरम्यान सुमारे ३३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पाच हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे-सातारा रस्त्यावरही उड्डाणपूल असेल, यासाठी सुमारे पाच हजार कोटींचा खर्च आहे. नाशिक फाटा येथेही सुमारे सात हजार ५०० कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT