पुणे

नितीशकुमार आणि मुलगा निशांत

CD

चिरंजिवांसह नितीशकुमार
प्रथमच पक्ष कार्यक्रमात एकत्र
पाटणा, ता. १८ (पीटीआय): जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे ४४ वर्षाचे पुत्र निशांतकुमार शुक्रवारी प्रथमच एका पक्षाच्या कार्यक्रमात एकत्र दिसले. पक्षाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात खासदार आणि आमदारांना सार्वजनिक जीवन आणि विधिमंडळातील कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नितीशकुमार यांनी दिवसभराच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. निशांतकुमार हेही त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. नितीशकुमार यांनी एप्रिलमध्ये बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी निशांत यांनी राजकारणात प्रवेश केला. कर्पुरी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पिता-पुत्राच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. नितीशकुमार दीपप्रज्वलन करत असताना निशांतही त्यांच्यासोबत होते. जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी सांगितले की, पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांमधील चर्चेत अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी सदस्यांना मार्गदर्शन करणे हा त्यामागचा उद्देश आहे. दरम्यान, पक्षाचे नाव जेडीयू-नितीश’ करणे आणि निशांत यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपविण्यासारखे मोठे निर्णय या कार्यक्रमात जाहीर केले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सध्या नितीशकुमार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. पक्षाचे नेते विजयकुमार चौधरी यांनीही पक्षाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेतच मांडता येईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

SCROLL FOR NEXT