Dr. Narendra Dabholkar Sakal
पुणे

Pune News : डॉ. दाभोलकर तसेच कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नव्हती; एस. आर. सिंग यांची माहिती

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नोंदविली नव्हती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नोंदविली नव्हती, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी मंगळवारी (ता.२२) उलट तपासणीत न्यायालयास दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर त्यांच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या व घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या बॅलेस्टिक एक्सपर्टला दाखवून याचे शस्त्र कसे असेल, याबाबत विचारणा केली का? ७.६ एमएमच्या गोळ्या कोणत्या शस्त्रातून झाडण्यात होतात?

शरीरातील गोळ्यांचा प्रवास कसा झाला? त्यानुसार त्या गोळ्या किती अंतरावरून मारल्या असतील हे बॅलेस्टिक एक्सपर्टला विचारले का? असे विविध प्रश्न सिंग यांना उलटतपासणीदरम्यान बचाव पक्षाकडून विचारण्यात आले. त्यावर सिंग यांनी ‘नाही’ असे सांगितले. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्यावतीने ॲड प्रकाश साळशिंगीकर यांनी उलटतपासणी घेतली.

डॉ. दाभोलकर यांचे नरेंद्र महाराज व त्यांच्या अनुयायांसोबत वैमनस्य होते का? असा प्रश्‍न ॲड. साळशिंगीकर यांनी विचारला असता त्यावर सिंग यांनी हो असे उत्तर दिले.

घटनास्थळाजवळ नरेंद्र महाराजांचे कोणी अनुयायी होते का? याबाबत तपास केला का? या प्रश्नावर सिंग यांनी नाही असे सांगितले. या खेरीज, जुलै २०१३ मध्ये बोगस डॉक्टरांविरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील गैरव्यवहारातून त्यांचा खून झाल्याच्या शक्यतेने तपास केला का? या प्रश्नावर सिंग यांनी नाही असे सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी बुधवारी (ता. २३) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT