Sharad Pawar eSakal
पुणे

Sharad Pawar : लोकसभा उपाध्यक्षपदासाठी मोदींकडून अपेक्षा नाही; ज्येष्ठ नेते शरद पवार

राज्यात सत्तापरिवर्तनासाठी एकत्र लढू

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः लोकसभा अध्यक्ष हे पद सत्ताधारी पक्षाला मिळते. तर लोकसभा उपाध्यक्ष हे पद विरोधी पक्षाला मिळण्याचा संकेत होता. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात तसे काही घडलेले नाही. त्यामुळे आता त्यात काही बदल होण्याची अपेक्षा नाही, अशी टिपण्णी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या जागावाटपा बाबतही पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी आणि माझे सहकारी आमची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो. ४८ जागांवर लढून ३१ जागांवर आम्हाला यश मिळाले. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. आता तसेच विधानसभा निवडणुकीमध्येही करावे लागेल. आम्ही एकत्र लढून लोकांना एक चांगला पर्याय देऊ आणि महाराष्ट्रात परिवर्तन आणण्यात यशस्वी ठरू, अशी लोकांची आमच्याकडून अपेक्षा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीत एकी राहण्यासाठी एक पाऊल मागे घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीतून आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे. त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून विधानसभेला जास्त जागांसाठी आग्रही असल्याचे संकेत पवार यांनी नुकतेच दिले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारले असता अद्याप बैठक झालेली नसून, बैठकीत चर्चा करून धोरण ठरवण्यात येणार आहे. आमची तिघांची एकत्रित काम करण्याची मानसिकता असल्याचे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT