no holi Dhulivandan celebration corona in pune district 
पुणे

पुण्यात होळी, धुलिवंदन साजरी करण्यास मनाई

सकाळवृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सभागृहे आणि सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमधील मोकळ्या जागांमध्ये होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात होळी व धूलिवंदन सण एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील जागा येथे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यास मनाई करणे आवश्यक झाले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्ह्यात यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या २८ मार्च रोजी होळी असून, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिलला रंगपंचमी आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हे उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ आणि कायद्यातील इतर तरतुदींनुसार कारवाई येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे. 

विश्रामबाग वाडा अंधारात; पुणे महापालिकेने वीजबिलच भरले नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT