Fire Brigade sakal
पुणे

Pune : बारामतीतच मिळणार अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्र

अग्निशामन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आता बारामतीतच उपलब्ध होणार

मिलिंद संगई, बारामती

बारामती - बांधकाम परवानगी घेताना व भोगवटा प्रमाणपत्र मिळविताना आवश्यक असलेले अग्निशामन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आता बारामतीतच उपलब्ध होणार आहे. क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्य शासनाने बारामती नगरपालिकेचे सहायक अग्निशामन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांना तात्पुरते व अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्रदान केल्याने आता बारामतीकरांना या प्रमाणपत्रासाठी पुण्याला जावे लागणार नाही. या मुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या अगोदर हे प्रमाणपत्र पीएमआरडीए यांच्याकडून घेणे बंधनकारक होते. पुण्यातील कार्यालयाकडे अगोदरच मोठा व्याप होता, त्या मुळे असे प्रमाणपत्र मिळविण्यास विलंब होत असे. आता बारामतीतच हे प्रमाणपत्र प्राप्त होईल. या मुळे वेळ, श्रम व पैसा यांची बचत होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना हे प्रमाणपत्र मिळविताना कमालीचा मनस्ताप व्हायचा, आता तीही अडचण दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारामतीतच हे अधिकार प्राप्त होऊन प्रमाणपत्र बारामतीतच मिळावे या साठी क्रेडाईने गेले अनेक महिने पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने आता ही गैरसोय दूर झाली आहे. पद्मनाभ कुल्लरवार यांना तात्पुरते व अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देणे व अग्निशामन यंत्रणेचे लेखापरिक्षण करण्याचा (फायर ऑडीट) अधिकार प्रदान करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT