Chaskaman Dam sakal
पुणे

Chaskaman Dam : चासकमान परिसरावर पाऊस रुसलेलाच; धरणात फक्त १३.३५ टक्के पाणीसाठा

खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान (ता. खेड ) धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसलेलाच.

सकाळ वृत्तसेवा

चास - खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान (ता. खेड ) धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसलेलाच असून, धरणात फक्त १३.३५ टक्के (१.०१ टीएमसी) पाणीसाठा झाला असून, भीमाशंकर परिसरात पडत असणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होत आहे. त्यामुळे खेड व शिरूर तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे.

मुंबई, कोकण, कोल्हापूर, सोलापूर यासह अन्य परिसरात गेली काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून येथील धरणे ओसंडून वाहताहेत. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून, जनजीवन विस्कळित झालेले आहे. याच्या उलट खेड तालुक्याची स्थिती असून, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

जून महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी शेतांमध्ये पेरणी केली असून, पिकांची उगवणही जोमदार झालेली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवली असून, गेल्या दोन दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमिनीतील ओल सुकणार आहे.

८.५४ टीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणसाठ्याची स्थितीही चिंताजनक असून, जुलै महिन्याचे दहा दिवस उलटून गेल्यावरही धरणात जेमतेम तेरा ते चौदा टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी हाच साठा १९ टक्क्यांच्या आसपास होता, तर २८ जुलै २०२३ रोजी धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग करण्यात येत होता.

श्री क्षेत्र भीमाशंकरच्या खोऱ्यात पडत असणाऱ्या कमी- अधिक प्रमाणातील पावसाने भीमा नदीचे पात्र प्रवाहित झालेले आहे. या पाण्यामुळे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होत आहे. जून महिन्याच्या सुरवातीला धरणात फक्त ७.५० टक्के (०.५७ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता, तर सद्यःस्थितीत दीड महिन्यानंतर त्यामध्ये फक्त सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. धरण परिसरात एक जूनपासून फक्त २२७ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

गेल्या वर्षीसारख्या पावसाची अपेक्षा

मागील वर्षी दहा जुलै रोजी धरणात १८.८५ टक्के पाणीसाठा झाला होता व परिसरात १४९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर वाढून केवळ १७ दिवसांत धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाची पाचही दारे उघडून भीमा नदीपात्रात ४३४० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. असाच काहीसा चमत्कार निसर्गाने केल्यास चासकमान धरण भरण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT