पुणे

गोंगाटामुळे अभ्यास नाही तर...

सकाळवृत्तसेवा

पुणे - मूळचा नाशिकचा सागर कापडणीस स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय; पण गणेशोत्सवातील गोंगाट हा सागरसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी डोकेदुखीच. या उत्सवात अभ्यासावर परिणाम होतो आणि वेळ वाया जातो. मग या विद्यार्थ्यांपुढे प्रश्‍न उभा ठाकतो तो या काळात काय करायचे? या प्रश्‍नाचे उत्तर सागरने शोधले, ज्यामुळे वेळेचा उपयोग झाला आणि त्याला चार पैसेही मिळाले. 

काय केले असेल बरे सागरने हे जाणून घेतले तेव्हा समजले की, सागरच्या घरची आर्थिक परिस्थिती फार काही वाईट नाही, तरीही त्याने गर्दीत जाऊन पाण्याच्या बाटल्या विकल्या. 

सागर आप्पा बळवंत चौकातील वसतिगृहात राहातो. याच भागात उत्सव रंगतो. त्यातील काही दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिर्वधक सुरू होते. त्यामुळे सकाळपासून गोंगाट आलाच. मग, सागरसह शेकडो विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला तसा पूर्णविरामच. उत्सावातील दहा दिवस घरी जाऊन अभ्यास करण्याऐवजी पुण्यात राहून काही करता येईल का, याचा विचार करून सागरने गर्दीच्या मार्गावर पाण्याच्या बाटल्या विकल्या. नुसतं बसून राहणे किंवा मौजमजा करण्यापेक्षा या वातावरणात छोटासा हंगामी व्यवसाय करून काही पैसेही मिळविले. सागरसोबतच गणेश व हृषीकेश हे त्याचे मित्र हा व्यवसाय करीत होते. त्यासाठी स्टॉल्सही सुरू केले. बाजीराव रस्त्यावरील स्टॉलवर दररोज सायंकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत जवळपास ४०० पाण्याच्या बाटल्यांची विक्री त्यांनी केली. एका बाटलीमागे ४ ते ५ रुपये नफा या हिशेबाने दररोज १५०० ते २००० रुपये नफा कमावल्याचे त्याने सांगितले.

आर्थिक अडचणी नसल्या तरी अशा संधीचा उपयोग करून कष्टाने आपण चार पैसे कमावले, तर पालकांवरचा थोडा भार कमी होतो, याचा मला आनंद आहे.
-सागर कापडणीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT