पुणे

दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’

CD

पिंपरी, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत दर गुरुवारी वाहन विरहित दिवस (नो व्हेईकल डे) पाळण्यात येणार आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केले.
महापालिकेत येण्या-जाण्यासह अन्य कामांसाठी प्रवास करावा लागतो. त्यासाठी अधिकारी, पदाधिकारी महापालिकेचे किंवा स्वत:चे वाहन वापरतात. काही वाहने महापालिकेने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. अशा वाहनांऐवजी पीएमपी, मेट्रो अशा सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर ‘नो व्हेईकल डे’च्या दिवशी अर्थात दर गुरुवारी केला जाणार आहे. अन्य दिवशीही पेट्रोल किंवा डिझेल ऐवजी ई-व्हेईकल वापरावेत, असे आवाहनही महापौर लांडगे यांनी केले.

अर्थसंकल्पीय सभावृत्तांत मंजूर
पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पाच हजार ६५५ कोटी रुपयांचा आहे. राज्य व केंद्र सरकारचे अनुदान मिळून नऊ हजार ३२२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. मार्च २०२७ अखेर सुमारे पाच कोटी रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज आहे. त्यासाठीच्या उपसूचनांसह आणि आवश्यक दुरुस्तीसह अर्थसंकल्पीय सभा वृत्तांत कायम करण्यात येत असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.

खेळाडूंचा सन्मान करा
सोलापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाड हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिला दोन लाख ९९ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बाबासाहेब त्रिभुवन व मनीषा चिंचवडे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत ठेवला होता. तसेच, दिव्यांग क्रिकेट संघात निवड झालेला साजिद तांबोळीसह श्रेया तरस या खेळाडूंनाही अर्थसाहाय्य देण्याची मागणी ऐश्वर्या तरस यांनी केली. या बाबतच्या क्रीडा धोरणावरील चर्चेत रेश्मा कातळे, राहुल कलाटे, शैलजा मोरे आदींनी सहभाग घेतला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT