pune sakal
पुणे

गडकिल्ल्यांवर ‘गोंगाट’; वन्यजीवांना धोका!

ध्वनी प्रदूषणामुळे पक्षी-प्राण्यांचे स्थलांतर; तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनलॉकनंतर गडकिल्ल्यांवर भटकंतीला नागरिकांची पसंती वाढत आहे. मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबीयांसोबत भटकंतीला जाणाऱ्या पर्यटकांकडून मनोरंजनासाठी म्युझिक स्पीकर किंवा ब्ल्यूटूथ स्पीकर घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मनुष्यासाठी ठरणारा मनोरंजनाचा हा पर्याय गडकिल्ल्यांच्या परिसरातील वन्यप्राण्यांसाठी धोक्याचे ठरत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात इला फाउंडेशनचे संचालक व पर्यावरण अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले, ‘‘गडकिल्ल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ (स्थानिक) वन्यप्राणी व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असतो. गडकिल्ल्यांच्‍या परिसरात असलेल्या झाडांवर किंवा किल्ल्यांच्या भिंतीतील देवळीत पक्ष्यांचे घरटे असते. नाईट कॅम्पींग किंवा दिवसा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे हे पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडतात व त्यांच्यावर इतर प्राणी किंवा पक्षी हल्ला करतात. तर काही पक्ष्यांना आवाजामुळे आपल्या नैसर्गिक अधिवासातून स्थलांतरित व्हावे लागते. परिणामी, प्रदेशनिष्ठ पक्ष्यांची संख्या कमी होत ते लुप्त होण्याच्या मार्गावर पोचतात.’

ऐतिहासिक गोष्टींना पाहण्याच्या दृष्टीने भटकंती करणारे आणि पार्टीसाठी येणारे, अशा दोन प्रकारचे पर्यटक गडावर येतात. पार्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांकडून मनोरंजनासाठी पर्यावरणाची हानी होणारे कामे केले जातात. तसेच, स्पीकर किंवा ब्ल्यूटूथचा वापर करत जोरजोरात गाणे वाजविले जातात. अशा प्रकारच्या पर्यटकांवर वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. पर्यटकांकडून गडकिल्ल्यांवर ध्वनी प्रदूषण केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील साधने जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

महत्त्वाचे मुद्दे

  1. राज्यातील पश्‍चिम घाटातील गडकोटांवर १९ प्रदेशनिष्ठ पक्षी आढळतात

  2. यातील १९ पैकी सात पुणे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर आढळतात

  3. जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांच्‍या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर

  4. पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांचे स्थलांतर

  5. स्थलांतरामुळे पक्षांच्या संख्येत घट

  6. प्राण्यांना मुक्तपणे वावर करता येत नाही

हे करणे आवश्‍यक

  1. सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर पर्यटनासाठीच्या वेळा निश्‍चित करणे

  2. ध्वनी प्रदूषण करणारे यंत्रणांच्या वापरावर बंदी घालणे

  3. ध्वनी प्रदूषणाशी निगडित सक्तीचे कायद्यांची गरज

  4. कायद्यांची अंमलबजावणी व पालन होत आहे का, हे सुनिश्‍चित करणे

  5. वन विभागाच्या वतीने पथकाची नेमणूक गरजेची

  6. धोरणात्मक योजना आखणे महत्त्वाचे

  7. पर्यटकांनी बेजबाबदार वर्तणूक टाळावी

  8. गडकिल्ल्यांवर आढळणारे प्रदेशनिष्ठ प्राणी, पक्षी

जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर पिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, तितर, शिळकरी कस्तूर, शृंगी घुबड, पहाडी लावा, रक्त लोचन घुबड आदी पक्षी आढळतात. त्याचबरोबर जावडी मांजर, मुंगूस, नाराच गरुड, सापमार गरुड, बहिरी ससाणा, तरस, खोकड, साळींदर, भेकर हरिण देखील असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT