Non Agriculture Tax Sakal
पुणे

अकृषिक कराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स फेडरेशनने दाखल केली याचिका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील लाखो जमीनधारकांची अकृषिक कर (Non Agriculture Tax) आकारणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स फेडरेशन यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. दोन्ही संस्थांकडून या बाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांपासून राज्यातील गृहनिर्माण संस्था आणि निवासी संकुलांसह हजारो भूधारक यांना स्थानिक तलाठी कार्यालयाकडून एनए कर (अकृषिक कर) भरण्यासाठी नोटिसा प्राप्त होत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील शहरी आणि उपशहरी भागातील निवासी जमिनींवर अकृषिक कराची आकारणी करणे हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्ससह अनेक भूधारकांना अकृषिक कराची मोठ्या रकमेची नोटीस मिळाली आहे. नोटीस मिळालेल्यांपैकी बहुतेकांना हा कर काय आहे, हे देखील माहिती नाही. स्थानिक तलाठी कार्यालयांशी संपर्क साधला असता ते या धोरण काय आहे किंवा त्याबाबतची इतर कोणतीही समाधानकारक माहिती देऊ शकत नाहीत, असे या याचिकेत नमूद आहे.

याबाबत पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन राजकीय नेते आणि मंत्र्यांनी दिले होते. मात्र आजतागायत त्याबाबत काहीही झालेले नाही. अधिनियमातील तरतुदी अकृषिक कराचा ब्रिटिश काळापासूनचा इतिहास आहे. जेव्हा सिंचन आणि लागवडीवर कर लावण्यात येत होता. ऐतिहासिकदृष्ट्या त्या काळात भारताला अन्नधान्याची टंचाई भेडसावत असल्याने जमिनीचे कृषी वापरातून अकृषिक वापरात रूपांतर करण्यावर नियंत्रण करण्याची गरज होती. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही.

निवासी जमिनी महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या अधिकारक्षेत्रात येतात. त्यावर आधीच मालमत्ता कर, पाणी, उपकर असे इतर अनेक कर आकारले जात आहेत. एमएलआरसीच्या तरतुदींमुळे तांत्रिक वर्गीकरण आणि भेदभाव देखील होत आहे. कारण एकीकडे, एकाच शहरातील किंवा एकाच गावातील काही भागातील निवासी स्थळांच्या जमिनींवर अकृषिक कर आकारून गोळा केला जात आहे. तर दुसरीकडे त्याच शहरातील काही जमिनींवर अकृषिक कर आकारणी केली जात नाही. अशा भेदभावामुळे भारतीय राज्यघटनेने हमी दिलेल्या समानतेच्या मूलभूत अधिकारास बाधा येत आहे.

- अॅड. सत्या मुळे, याचिककर्त्यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT