mask 
पुणे

मास्क न वापरल्यास या गावात अजामीनपात्र गुन्हा 

श्रद्धा जोशी

गुळुंचे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील नीरा- शिवतक्रार येथे काल कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नीरा बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवावी, गावात मास्क न घालता फिरल्यास आणि शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनाला आल्यास अजामीनपात्र गुन्हे नोंदवावेत, असे आदेश पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी केले. 

नीरा येथील बाजारपेठेत तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी सरनौबत यांनी नीरा येथे भेट देत विविध विभागांना कार्यवाहीचे आदेश दिले. पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील नीरा येथे अद्याप कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे बाजारपेठ सुरू होती. लोणंद, जेजुरी, सासवड यांसारख्या मोठ्या गावात कोरोना रुग्ण आढळल्याने तेथील अनेक लोक खरेदी- विक्रीसाठी नीरेत येत होते. मात्र, काल आठवडे बाजाराच्या दिवशी प्रभाग दोनमधील तरुण कोरोनाग्रस्त आढळल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली होती. ही बातमी कळताच येथील बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. आता तालुक्यातील मोठ्या गावात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. 

नीरा येथील कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या थेट संपर्कातील १८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, लो रिस्कमध्ये ४४ जणांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, आरोग्य विभागाकडून संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने, उपसरपंच विजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मनोज डेरे, आरोग्य विभागाच्या अश्विनी घाटगे,  गणेश जाधव, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, विजय वाघमारे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते.

नीरा येथे रुग्ण सापडलेला प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र असेल. उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी निर्णय घेण्यात येईल. पहिले ३ दिवस गाव बंद ठेवावे. विनाकारण घराबाहेर पडू नये.
 - रुपाली सरनौबत, तहसीलदार, पुरंदर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT