pm modi 
पुणे

शिक्षकांचे पंतप्रधानांना पत्र; जीवन वाचवण्याची केली विनवणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विनाअनुदानित शाळांवर काम करणारे हजारो शिक्षकांना गेल्या अठरा-वीसवर्षांपासून अधिक काळ पगाराविना काम करत आहेत. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही दाद मिळत नसल्याने शिक्षकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठविण्यास सुरवात केली आहे. हे शिक्षक वैयक्तिक स्वरुपात आपल्या मागण्यांकरिता पंतप्रधानांकडे दाद मागत आहेत. "विनाअनुदानित शाळांवरील शिक्षक पगाराविना असल्याने त्यांचे जीवन वाचवा", अशी विनवणी शिक्षक करत आहेत.

पागार नसला, तरी विनाअनुदानित शाळेतील शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. मात्र अनेकांना उदरनिर्वाहासाठी मोलमजूरी करावी लागत आहे. राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमधील प्राध्यापकांनी जून २०२० पासून विविध मागण्यांसाठी राज्यभर आमरण उपोषण केले. त्यात राज्यातील जवळपास २२ हजार ५०० शिक्षक सहभागी झाले होते. त्यावेळी देखील केवळ आश्वासन दिले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेमार्फत वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. मात्र तरीही राज्य सरकार गांभिर्याने विचार करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी हे पत्र राज्यातील प्रत्येक शिक्षक पंतप्रधानांना पाठवत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT