Students_Engineering 
पुणे

'ट्रान्सक्रिप्ट'साठी इंजिनीअरिंगच्या एकाही विद्यार्थ्यांचा अर्ज नाही; काय आहे हे ट्रान्सक्रिप्ट?

ब्रिजमोहन पाटील

पुणे : परदेशी शिक्षण असो वा नोकरीच्या संधी... मुलाखतीला जाताना पदवीच्या सर्व वर्षाच्या गुणांचा सारांश असलेले ट्रान्सक्रिप्ट आवश्यक आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा पासून गुणपत्रिकेसह ट्रान्सक्रिप्ट देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे, मात्र अभियांत्रिकीच्या एकाही विद्यार्थ्यांने यासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

गेल्या काही वर्षात पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्याचा 'ट्रेंड' वाढत आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विद्यार्थी 'ट्रान्सक्रिप्ट'साठी अर्ज करतात. अर्ज केल्यावर पंधरा दिवसांमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र मुदतीत हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळत नाही. या प्रमाणपत्रासाठी सहा महिने वाट पहावी लागत होती. वेळेत ट्रान्सक्रिप्ट मिळावे म्हणून काही विद्यार्थी न्यायालयातही गेले होते.

या नामुष्कीमुळे ट्रान्सक्रिप्ट लगेच देण्यासाठी काय करता येईल याचा विचार विद्यापीठाने केला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने अभ्यास करून निकालपत्रासह ट्रान्सक्रिप्ट देण्यास हरकत नाही, असा अहवाल सादर केला होता. त्यास पुणे विद्यापीठाने मान्यता देऊन २०१९-२० च्या निकालापासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी व फार्मसीसाठी सुविधा

यंदा पहिल्या वर्षी अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना 'ट्रान्सक्रिप्ट' देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना त्यामध्येच 'ट्रान्सक्रिप्ट' हवे की नाही याबद्दल विचारणा केली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सक्रिप्टची मागणी केली आहे, त्यांना निकालपत्रासह मिळणार आहे. यामध्ये फार्मसीच्या २ हजार १७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, पण अभियांत्रिकीच्या एकाही विद्यार्थ्यांने अर्ज न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"विद्यार्थ्यांना वेळेवर ट्रान्सक्रिप्ट मिळाले पाहिजे समितीने अहवाल मांडला होता. त्यानुसार यंदा फार्मसी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना निकालपत्रासह ट्रान्सक्रिप्ट मिळेल. पूर्वी यासाठी अनेक महिने लागत होते, आता विद्यार्थ्यांना वाट पहावी लागणार नाही."
- प्राचार्य डाॅ. संजय चाकणे

"अंतिम वर्षाचे परीक्षा अर्ज भरतानाच ट्रान्सक्रिप्ट हवे की नाही याबाबत पर्याय दिला आहे. यंदा फार्मसीच्या २ हजार १७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, निकाल जाहीर करताना या विद्यार्थ्यांना ट्रान्सक्रिप्ट दिले जाईल. तर, अभियांत्रिकीच्या एकाही विद्यार्थ्यांने अर्ज केलेला नाही."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT