(पंचायत समिती
उत्तर सोलापूर) लोगो करावा
उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृतचे वेध
एका जागेमुळे चुरस मोठी; जुन्या-नव्यांचे समीकरण साधण्याचे पालकमंत्र्यांसमोर आव्हान
उ. सोलापूर, ता. ४ ः राज्य सरकारच्या निर्णयामुळे उत्तर सोलापूर पंचायत समितीमध्ये एक स्वीकृत सदस्य नियुक्त केला जाणार आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या रूपाने एक मोठा गट निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सामील झाला. यामुळे काही जुन्या कार्यकर्त्यांची निवडणुकीतील संधी हुकली. अशा कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पदाचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यात सर्वात कमी सदस्य संख्या असलेल्या उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या मात्र मोठी आहे. सरकारच्या निर्णयानुसार एकच सदस्य निवडला जाणार आहे. केडर बेस कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये आता सर्व निर्णय काँग्रेस प्रमाणे पक्षश्रेष्ठींच्या हातात गेले आहेत. पक्षाचे जिल्ह्यातील निर्णय हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याच इशाऱ्यावर होतात असा दावा केला जात आहे. साहजिकच उत्तर मधील स्वीकृत सदस्याच्या बाबतीतही त्यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजपच्या राजकारणात सध्या माजी आमदार दिलीप माने व राज्य कार्यकरणीचे सदस्य शहाजी पवार असे दोन गट आहेत. आमदार सुभाष देशमुख यांचा गट निष्प्रभ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे निवडी वेळी ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत सध्या उत्सुकता आहे.
तिकीट वाटपात दिलीप माने यांचे वर्चस्व दिसून आले. त्याचबरोबर निवडणुकीत यशवंत माने यांच्या गटालाही दोन पंचायत समितीच्या जागा देण्यात आल्या. यामुळे मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आपली उमेदवारी माघारी घ्यावी लागली. आता या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पदी संधी देऊन न्याय देण्याची मागणी होत आहे. मात्र माजी आमदार दिलीप माने व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पूर्वाश्रमेतील पक्षापासूनचे संबंध पाहता स्वीकृत सदस्याची संधीही माने गटाला जाणार का हाही उत्सुकतेचा प्रश्न आहे.
चौकट
सुतार की बंडगर
झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार हे पंचायत समिती साठी इच्छुक होते. त्याचबरोबर त्यांनी नान्नज जिल्हा परिषद गट लढवण्याची ही तयारी दाखवली होती. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना संधी मिळाली नाही. त्याचबरोबर पक्षाचे माजी सरचिटणीस पाथरीचे श्रीमंत बंडगर हेही पंचायत समितीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. सध्या या दोघांच्या नावाची स्वीकृत सदस्य पदासाठी चर्चा सुरू आहे. हे दोन्हीही भाजप नेते शहाजी पवार यांचे समर्थक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.