पुणे

अटक आरोपींना ठेवायचे कुठे?

संदीप घिसे

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी सध्या पुरेसे लॉकअप नाहीत. सध्या केवळ चार लॉकअप आहेत, तर महिलांना ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकअपच नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने पिंपरी पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

आयुक्‍तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, दिघी, एमआयडीसी-भोसरी, आळंदी, चाकण ही आठ पोलिस ठाणी येतात; तर परिमंडळ दोनच्या हद्दीत सांगवी, वाकड, हिंजवडी, चिखली, देहूरोड, तळेगाव आणि एमआयडीसी-तळेगाव ही सात पोलिस ठाणी येतात. परिमंडळ एकमध्ये पिंपरी आणि भोसरी येथे अधिकृत लॉकअप आहेत, तर परिमंडळ दोनमध्ये फक्‍त देहूरोड येथेच लॉकअप आहे. शहरात महिला आरोपींसाठी एकही लॉकअप नसल्याने त्यांना पुण्यातील फरासखाना येथे ठेवण्यात येते. मात्र, आता तेथेही आरोपी ठेवण्यास पुणे पोलिस तयार नसल्याने महिला आरोपी कुठे ठेवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला. 

यामुळे पोलिसांनी सरकारची मान्यता न घेता केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ घेऊन दिघी पोलिस ठाण्यात दहा आरोपींना ठेवण्यासाठी १५ दिवसांपूर्वीच नव्याने लॉकअप सुरू केले आहे. जर एखाद्या महिला आरोपीला अटक केली तर संबंधित पोलिस ठाण्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करून त्यांना दिघी येथे ठेवण्याबाबत तयारी केली आहे.

परवानगीविना लॉकअप पडून
हिंजवडी, वाकड, एमआयडीसी, चिंचवड आदी पोलिस ठाण्यांमध्ये लॉकअप तयार करण्यात आले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सरकारकडून परवानगी न आल्याने ही लॉकअप सध्या वापराविना पडून आहेत; तर काही ठिकाणी स्वतःच्या जबाबदारीवर चौकशीसाठी अटक केलेल्या आरोपींना काही वेळाकरिता येथे ठेवण्यात येत आहे.

दिघी पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दहा आरोपींना ठेवण्यासाठी दोन लॉकअप सुरू केले आहेत. महिला आरोपी असल्यास त्यापैकी एका लॉकअपमध्ये महिला आरोपींना ठेवण्यात येईल. इतर लॉकअप सुरू करण्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
- स्मार्तना पाटील,  पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ एक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT