शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे-बालेवाडी) - अखिल भारतीय पोलिस नेमबाजी (क्रीडा) अजिंक्‍यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाला. या वेळी ठाकरे यांनी ज्येष्ठ नेमबाज चंद्रो तोमर, प्रकाशी तोमर (शूटर दादी) यांची आवर्जून भेट घे 
पुणे

जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही - मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

पुणे - नेमबाजी हा श्‍वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सरकार कटिबद्ध असून, राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. पोलिस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचनाही केली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात १३ व्या अखिल भारतीय पोलिस नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेचा समारोप ठाकरे यांच्या हस्ते झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर, श्रीमती प्रकाशी तोमर (शूटर दादी), पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, निवृत्त पोलिस अधिकारी टी. एस. धिल्लन, रितू छाब्रिया उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, स्पर्धेमध्ये जय-पराजय होतच असतात. मात्र, स्पर्धेच्या निमित्ताने पोलिस दलाच्या नेमबाजीतील गुण तक्‍त्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीवर दहशत बसेल. हा खेळ श्‍वासावर नियंत्रण राखणारा मेंदूच्या योगाचा आणि मन:शांतीचा उत्तम पर्याय आहे. याचसाठी मला नेमबाजीचा छंद आहे.

जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तोमर दादी देशाच्या प्रेरणा आहेत. प्रत्येक पोलिसाचा नेम अचूक असणे आवश्‍यक आहे. पोलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत. पोलिस व संरक्षण दलामुळेच सर्वसामान्य लोक निश्‍चिंत असतात. अचूकता, शिस्त हे पोलिस दलाचे वैशिष्ट्य आहे. विजेत्यांचे अभिनंदन; मात्र पुढच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुबोधकुमार जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. संदीप बिष्णोई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT