Pune-Municipal 
पुणे

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना पालिका बजाविणार नोटीस

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा महापालिकेतील काही कर्मचारी गैरफायदा घेत आहेत. कामावर येण्याऐवजी ते घरी राहत असल्याने त्याचा ताण अन्य कर्मचाऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता अशा कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. अशा काळात आरोग्य खात्याबरोबरच अन्य खात्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे.

सर्वेक्षणापासून शेल्टर्स हाऊसमध्ये ठेवलेल्या नागरिकांना जेवण देण्यापर्यंतच्या कामांची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे; परंतु अनेक कर्मचारी  आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचे कारण देत घरीच राहत आहेत. त्यामुळे प्रशासनापुढे अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. कर्मचारी वर्ग अपुरा पडू लागल्याने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे.

अखेर याची दखल घेऊन कामावर हजर राहा, अशा सूचना देऊन जे कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशा सूचना खातेप्रमुखांना देण्यात आल्या असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलन, ७ जणांचा मृत्यू, २७ जण अडकले; मिथेन गॅसचा स्फोट, बचावकार्यात अडथळे

Cricketer Arrest: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; हायकोर्टाचे तात्काळ अटकेचे आदेश

Live Updates Marathi : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेत आंदोलन

Samruddhi Accident: सोडण्यासाठी गेले, ते कायमचेच सोडून गेले! बहीण, आई-वडीलांचा मृत्यू, आता घरात तन्वी एकटीच

Lionel Messi: मेटलाइफ स्टेडियम मेस्सीसाठी दुर्दैवी; कोपा अमेरिकापाठोपाठ विश्वकरंडक स्पर्धेतही अपयश

SCROLL FOR NEXT