Pooja Khedkar Esakal
पुणे

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना केंद्र सरकारच्या विभागाकडून नोटीस

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी दोन ऑगस्टपर्यंत समक्ष येऊन लेखी खुलासा करावा, असे नोटिशीत म्हटले आहे.

खेडकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला होता. याबाबत खेडकर यांनी वाशीम पोलिसांत तक्रार दिली होती. वाशीम पोलिसांनी ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली. याबाबत जबाब नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांनी खेडकर यांना तीनदा समन्स बजावले आहे.

परंतु त्या अद्याप हजर झालेल्या नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी खेडकर यांच्याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. खेडकर यांनी त्यांच्यावरील आरोपाबाबत लेखी खुलासा करावा, अशी नोटीस केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT