रेणुकामाता मल्टिस्टेटतर्फे
मंगळवारी नवचंडी पूजा
अहिल्यानगर, ता. २२ ः येथील श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅप अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजता नवचंडी पूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. प्रशांत भालेराव यांनी दिली. एकवीरा चौकातील रेणुका भवन येथील शाखेत हा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------