Court 
पुणे

आता दुसऱ्या पत्नीलाही द्यावी लागणार पोटगी

सनील गाडेकर

पुणे - लग्न झाल्याचे लपवून त्याने विधवा महिलेबरोबर दुसरा संसार थाटला. तिच्याकडे असलेले १५ लाख रुपये उकळले. त्यामुळे तिने पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. पोटगी मंजूर झाल्याच्या आदेशाविरोधात तो सत्र न्यायालयात गेला. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत पतीला दुसऱ्या पत्नीस पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला. 

हिंदू विवाह कायद्यात दुसऱ्या पत्नीस पोटगी देण्याची तरतूद नाही. मात्र, महिलेची फसवणूक करून तिच्याशी लग्न केल्याचे निदर्शनात आल्यानंतर तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी देण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवले आहेत. उषा यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्याने त्या तीन मुलांसह माहेरी पुण्यात राहत होत्या. त्या काळात त्यांची सुरेशशी (नावे बदललेली) ओळख झाली. पतीच्या निधनानंतर उषा यांना वाटपात मिळालेले १५ लाख रुपये सुरेश याने विविध कामांना वापरून संपवून टाकले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उषा वेगळ्या राहू लागल्या. मात्र, तो त्यांना घरी जाऊन त्रास देऊ लागला. सुरेशच्या पहिल्या पत्नीने व भावांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे उषा यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोटगी आणि प्रतिबंधात्मक आदेशासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी उषा यांना दरमहा पाच हजार रुपये पोटगी व त्यांच्या घरात न जाण्याचे आदेश सुरेशला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT