Now students will get online career guidance during Lockdown
Now students will get online career guidance during Lockdown 
पुणे

लॉकडाऊनमध्ये आता विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार करिअर गाईडन्स

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सातत्याने  घरात असल्याने अथवा अन्य काही कारणांमुळे मुलांच्या वागण्यात काही बदल झाल्याचे जाणवल्यास तुम्हाला घरबसल्या समुपदेशन घेता येणार आहे. होय, हे आता शक्य आहे. कारण राज्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशन व करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने चारशेहुन अधिक समुपदेशकांची यादी प्रसिद्ध केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समुपदेशकांची संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय  केव्हा सुरू होणार याबाबत निश्चित सांगणे कठिण आहे.  मात्र या काळातही काही विद्यार्थी घरी बसूनच ऑनलाइन पद्धतीने विविध अभ्यासक्रम शिकत आहेत. परंतु, अनेक दिवस घराबाहेर न पडल्यामुळे विद्यार्थी मानसिक ताण तणावाखाली येऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात करिअर विषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या प्रश्नांचे किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. 

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

यासाठी जिल्हानिहाय काही समुपदेशकांची निवड करण्यात आली आहे. हे समुपदेशक दूसरे-तिसरे कोणी नसून समुपदेशनाचे प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आहेत. पुणे जिल्ह्यासाठी ४०हुन अधिक समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मुंबई, नागपूर, कोल्हापूर , नाशिक , अहमदनगर ,औरंगाबाद , हिंगोली, जळगाव , लातूर , नांदेड ,नंदुरबार ,पालघर , परभणी , रायगड आदी जिल्ह्यांसाठी सुद्धा समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समुपदेशक देतील याबाबत मिळेल सल्ला :
-  मुलांना मानसिक तणाव असल्यास
- दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
- मुलांच्या वागण्या-बोलण्यातील बदलांबाबत पालकांच्या शंकाचे निरसन

स्ट्रेस कमी करायचाय? घरबसल्या करा ऑनलाईन योग ध्यानसाधना

- समुपदेशकांची यादी पहा या संकेतस्थळावर : " http://www.maa.ac.in/ "
- समुपदेशकांची माहिती व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध
- विना शुल्क केले जाणार समुपदेशन
- ४०३ समुपदेशकांची सविस्तर यादी उपलब्ध

पुण्यात पाय ठेवताच घरच्यांना बघून आले गहिवरून; कोटाहून परतलेल्या विद्यार्थ्यांची आपबिती​

विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सूरू करण्याचा विचार
"लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी ही यंत्रणा कार्यन्वित केली आहे. सध्या तातडीने विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि करिअरबाबत मार्गदर्शनासाठी सर्वांगीण हेल्पलाइन सूरू करण्यात येणार आहे."
- दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT