Biomedical waste Sakal
पुणे

आता चिंता कोविड जैव वैद्यकीय कचऱ्याची

कोरोना काळात देशातील पर्यावरणात मोठे प्रतिकूल बदल झाले आहेत. या बदलांच्या अभ्यासावरील अहवाल नुकताच ‘सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरन्मेंट’ (सीएसई) या संस्थेने जाहीर केली आहे. हवा, पाणी, जैव वैद्यकीय कचरा, कृषी अशा विविध बाबींचा लेखाजोखा त्यात मांडण्यात आला आहे.

अक्षता पवार

पुणे - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave) देशात ‘कोविड जैव वैद्यकीय’ (Covid Biomedical Waste) कचऱ्यात पुन्हा भर पडली आहे. जून २०२० ते आतापर्यंत मे २०२१ मध्ये सर्वाधिक कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मे महिन्यात दररोज दोन लाख तीन हजार किलो (२०३ टन) कोविड जैव वैद्यकीय कचरा तयार होत होता. (Now the Concern Covid Biomedical Waste)

देशात निर्माण होणाऱ्या एकूण कोविड जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत केरळ, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक ही राज्य आघाडीवर आहे. केरळमध्ये सर्वाधिक २३ हजार ७१० तर लक्षद्वीपमध्ये सर्वांत कमी १० किलो कचरा तयार होत होता. राज्यात दररोज १९ हजार किलोग्रॅमहून अधिक कोविड जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या दुसरे लाटेचे रौद्र रुप मे महिन्यात पाहायला मिळाले होते. याकाळात देशातील रुग्णसंख्या देखील सर्वोच्च स्थानी पोचली होती. त्यामुळे या महिन्यात सर्वाधिक कोविड जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला होता. २०१७ साली वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण ९२.८ टक्के होते. २०१९ साली ८८ टक्क्यांपर्यंत खाली आले. सध्या सुमारे १२ टक्के जैव वैद्यकीय कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

- देशात एप्रिल ते मे दरम्यान कोविड जैव वैद्यकीय कचऱ्यात ४६ टक्के वाढ

- सुमारे १२ टक्के जैव वैद्यकीय कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही

- बिहारमध्ये ६९ टक्के तर कर्नाटकात ४७ टक्के जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया नाही

पुण्यात मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत एकूण ५०७.४१ टन सामान्य जैव वैद्यकीय कचरा तर ४३७.९२ टन इतका कोविड जैव वैद्यकीय कचरा निर्माण झाला होता. यामध्ये सर्वाधिक कोविड जैव वैद्यकीय कचरा एप्रिल महिन्यात निर्माण झाला होता. तर महापालिका आणि पास्को यांच्या वतीने येत्या काही महिन्यात पुण्यात कोविड व सामान्य जैव वैद्यकीय कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

- सुनील दंडवते, संचालक, पास्को कंपनीचे

दुसऱ्या लाटेत पुणे शहरात निर्माण झालेला जैववैद्यकीय कचरा

महिना : कोविड जैव वैद्यकीय कचरा (टनांमध्ये)

मार्च : ८९

एप्रिल : १७८.९६

मे : १६९.९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT