Lifestyle 
पुणे

लॉकडाऊन शिथील झालाय; पुणेकरांनी बाहेर पडताना काय काळजी घ्यावी?

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याचबरोबर नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाशी यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी नागरिकांनीही आपल्या जीवनशैलीत बदल करणे अपेक्षित आहे. नागरिकांना कोणत्या सवयी बदलायला हव्यात आणि काय काळजी घ्यावी याचा घेतलेला आढावा...

घराबाहेर पडताना काय काळजी घ्याल ?
    घरातून बाहेर पडताना मास्क किंवा स्कार्फचा वापर 
    बाहेर पडताना हॅंड सॅनिटायझर सोबत घेऊन जाणे 
    सोबत रुमाल, टिश्‍शू ठेवा आणि ग्लोव्हज वापरा
    फ्लू असल्यास घराबाहेर पडणे टाळा
    सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर शक्‍यतो टाळा 
    स्वच्छ केल्याशिवाय कोणत्याही वस्तूला हात लावू नका
    रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळा
    लॉकडाऊन नंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
    गर्भवतींनी रुग्णालयातील भेटी शक्‍य तितक्‍या कमी कराव्यात
    बाहेर पडताना घातलेले कपडे घरी आल्यानंतर शक्‍यतो बाहेरच धुवा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑफिस आणि व्यवसायाच्या ठिकाणी काय काळजी घ्याल ?
    ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांत किमान १ मीटरचे अंतर ठेवावे
    कर्मचाऱ्यांचे गट करून त्यांना आठवड्यातील ठराविक वारी बोलवावे
    वर्क फ्रॉम होम आणि कार्यालयातून काम ही पद्धत ठराविक दिवसांप्रमाणे वापरावी
    कॅंटीनमध्ये अंतर राखून बसण्याची व्यवस्था 
    ऑफिसमध्ये सॅनिटायझर आणि हॅंडवॉशचा वापर करावा 
    संगणक किंवा इतर वस्तू दररोज पुसून घेणे
    व्यवसायाच्या ठिकाणी कमी कामगारांना नेमावे 
    दुकानांमध्ये स्वच्छता राखण्यात यावी 
    हॅंडग्लोव्हज घालून वस्तूंची विक्री करण्यात यावी
    दुकानात मास्कचा वापर नेहमी करावा

डेंगी, मलेरिया तसेच, इतर आजारांपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे याबाबत नागरिक काळजी घेत होते. मात्र, सातत्याने हात साबणाने धुवायचे किंवा रुमालाचा वापर एवढा होत नव्हता. परंतु, कोरोनाच्या उद्रेकामुळे आता लोकांमध्ये चांगल्या सवयी निर्माण झाल्या आहेत. 
- डॉ. राहुल यादव, संजीवनी रुग्णालय

‘कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येत नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसाठी नवनवीन पर्याय शोधणे गरजेचे आहे. पूर्णपणे ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत देण्याऐवजी काही ठराविक दिवसच या कार्यपद्धतीचा वापर करण्यास परवानगी द्यावी. 
- नितीन देशपांडे, 
अध्यक्ष, एवोलेंट हेल्थ इंटरनॅशनल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT