पुणे

विज बिलाबाबत शंका वाटतेय? तर...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : लॉकडाऊननंतर आलेल्या विज बिलातील मीटर रिडींग व बिलाच्या रकमेबाबत आपणास शंका वाटतेय... घाबरु नका...मीटर रिडींग असो वा बिलाची रक्कम याबाबतच्या आपल्या शंका दूर करण्यासाठी विज वितरण कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात न जाता, घरबसल्या महावितरण कंपनीच्या संकेतसंस्थळावर जाऊन मिटर रिडींग, बिलाची रक्कम आदी बाबीसह विज बिल पडताळून पाहू शकता.

मीटर रिडींग असो वा बिलाची रक्कम याबाबतच्या आपल्या शंका दूर करण्यासाठी विज वितरण कंपनी महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील बिल तपासण्याची लिंक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. तसेच ही लिंक सोशल मीडियावरही (https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ) व्हायरल केलेली आहे. यामुळे लॉकडाऊनकाळानंतर आलेल्या विज बिलावर शंका घेण्यापेक्षा, विज ग्राहकांनी वरील लिंकवर जावे व सदर लिंकवर ग्राहक क्रमांक नोंदवून विज बिलावरील रिडींग व मीटरवरील रिंडींग पडताळून स्वत:ची शंका दूर करावी, असे आवाहन महावितरण कंपनीच्या उरुळी कांचन मंडलचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप सुरवसे यांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशभरात कोरोनचा रुग्ण आढळून येऊ लागल्याने, देशभरात मागील 23 मार्चपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने वीज मीटर रिडींग, बिलांची छपाई व वाटप या तिन्ही प्रक्रिया थांबविण्यात आल्या. त्यानंतर विज वितरण कंपनीने 23 मार्च ते 31 मे पर्यंत किंवा जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत अडीच ते तीन महिन्याचा वीज वापर मागील तिमाहिच्या (डिसें, जाने व फेब्रु) सरासरीनुसार ग्राहकांना बिले देण्यात आली आहेत. मात्र, ही बिले चुकीचे असल्याचे सांगत, अनेक ग्राहकांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप सुरवसे यांनी ग्राहकाना वरील आवाहन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना प्रदीप सुरवसे म्हणाले, ग्राहकांना सध्या देण्यात आलेली विज बिले ही डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्याच्या सरारीनुसार दिली आहेत. मात्र, तीनही महिने हिवाळ्याचे असल्याने, तीन महिन्यातील विजेचा वापर कमी होता. मात्र २३ मार्चनंतरच्या काळात लॉकडाऊनमुळे व उन्हाळा असल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे सरासरी कमी तर वापर जास्त झाला. सध्या विज वितरण कंपनीने दिलेली वीजबिले अचूक आहेत. या बिलाला तीन महिन्यात विभागून प्रत्येक महिन्यात वापरानुसार जो स्लॅब बेनिफिट ग्राहकाला मिळायला हवा होता तो जूनच्या बिलामध्ये दिला आहे. तसेच बिलाच्या पाठीमागील बाजूस वजा सरासरी देयकाची रक्कम म्हणून याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रदीप सुरवसे पुढे म्हणाले, ग्राहकांना 31 मार्चपूर्वीचा वापरावर जुनाच दर लावलेला आहे. तर एक एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू झाल्याने, विज बिलाची आकारणी नवीन दरानुसार करण्यात आलेली आहे. ग्राहकांनी आलेल्या विज बिलावर शंका घेण्यापेक्षा, वरील लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक नोंदवून बिलावरील रिडींग व मीटरवरील रिंडींग पहावे . त्यानंतरही कांही शंका असल्यास कार्यासयात येऊन शंका दुर कराव्यात. मात्र आलेले विज बिल तातडीने भरुन महावितरणला सहकार्य करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT