pune sakal
पुणे

आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्याने पीक कर्ज

पुणे जिल्हा बॅंकेचा निर्णय ; येत्या रब्बी हंगापासून अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आहे. याबाबतचा निर्णय बॅंकेच्या गुरुवारी (ता.३०) झालेल्या १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या आठ दिवसात याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाला पाठविला जाणार आहे. येत्या रब्बी हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेणारी पुणे ही देशातील एकमेव जिल्हा बॅक ठरली आहे.

तीन लाखांहून अधिक आणि पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीन लाखांपुढील रकमेचे म्हणजे उर्वरित दोन लाख रुपयांचे व्याज जिल्हा बॅक भरणार आहे. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज ही घोषणा केली.

मागील सुमारे बारा वर्षांपासून पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंका शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात येत आहे. या दोन्ही बॅंकांचा शून्य टक्के व्याजाचा हा पॅटर्न राज्यभर चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून घेतला आहे. राज्य सरकारने या निर्णयाची चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून अंमलबजावणी सुरु केली आहे. यामुळे चालू वर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात आले आहे.

पुणे जिल्हा बॅंकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.३०) आॅनलाइन झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे या सभेला आॅनलाइन उपस्थित होते. जिल्हा बॅंकेच्या सभागृहात झालेल्या या सभेला बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आणि संचालक उपस्थित होते.

ग्राफीकसाठी बुलेट्स

  1. जिल्हा बॅंकेचे एकूण सभासद --- १० हजार ९६४

  2. एकूण सभासदांपैकी सहकारी संस्था सभासद --- ९ हजार २३१

  3. व्यक्ती सभासद --- १ हजार ७३३

  4. बॅंकेचे अधिकृत भाग भांडवल --- ५०० कोटी रुपये

  1. बॅंकेचे वसूल भाग भांडवल --- ३३८ कोटी ८० लाख रुपये

  2. बॅंकेची एकूण उलाढाल (मार्च २०२१ पर्यंत) --- १९ हजार ४३९ कोटी २४ लाख रुपये

  3. बॅंकेच्या एकूण ठेवी --- ११ हजार ३२९ कोटी ९९ लाख रुपये

  4. जिल्हा बॅंकेच्या एकूण शाखा --- २९४

  5. एकूण कर्ज वाटप --- ८ हजार १०९ कोटी २५ लाख रुपये

जिल्हा बॅक ही शेतकऱ्यांची बॅक आहे. या बॅंकेचा खरा मालक हा शेतकरी आहे. शून्य टक्के पीक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यांची मागणी पूर्ण करणे हे बॅंकेचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य आज पार पाडले आहे. यामुळे अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

- रमेश थोरात,

अध्यक्ष, जिल्हा बॅक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT